ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
<em>एक दिवस "बांधावरची शाळा" - चिंदर पालकरवाडी शाळेचा उपक्रम.</em>

<em>एक दिवस "बांधावरची शाळा" - चिंदर पालकरवाडी शाळेचा उपक्रम.</em>

प्रकाशन: 09 Jul 2022 01:07 PM
वाचन संख्या 182

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित “बळीराजासाठी एक दिवस” या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर पालकरवाडी या शाळेत बांधावरची शाळा हा उपक्रम उत्साहात साजरा केला. चिंदर पालकरवाडी येथील प्रगतशील शेतकरी श्री.रवींद्र जगन्नाथ लब्दे यांच्या शेतात मुलांनी शेतीच्या कामाचा आनंद अनुभवला, बांधावरची शाळा उपक्रमा वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.दिक्षा विद्याधर पालकर, मुख्याध्यापक श्री शिवानंद सोलापुरे, सहकारी शिक्षक श्री नंदकुमार जुंदळे, श्री.चेतन लब्दे, श्रीम.प्रिया पालकर, सौ.लक्ष्मी पालकर व सौ.वेदा चेतन लब्दे उपस्थित होते. शेतकरी श्री रवींद्र लब्दे यांच्या बरोबर मुलांनी संवाद साधला शेती करताना करावी लागणारी विविध कामे, जमिनीची मशागत, पेरणी, तरवा काढणे, तसेच तरवा लावणे, चिखल करणे, यासारख्या कामांची माहिती मिळवली शेती कामासाठी लागणारी हत्यारे कुदळ फावडे या विषयी सर्व माहिती करून घेतली. मोबाईल युगात मुलांना शेती विषयी रस निर्माण करण्यासाठी “बांधावरची शाळा” हा उपक्रम स्तुत्य असल्याचे शिक्षण प्रेमी श्री.रवींद्र लब्दे म्हणाले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स