मसुरे केंद्र शाळेचे विद्यार्थी रमले बांधावरच्या शाळेत..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
शाळा ही सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारे एक माध्यम आहे, तसेच नवनवीन गोष्टी येथे शिकवल्या जातात. तिथे मुलांना नवे काहीतरी शिकण्याची संधी मिळते. याच गोष्टीचा विचार करून शासनाने शैक्षणिक दृष्ट्या शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या जीवन ,शेतीची अवजारे याबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी ‘बांधावरची शाळा’ हा अभिनव उपक्रम राबवला आहे. श्री दाजीसाहेब प्रभूगावकर केंद्र शाळा मसुरे नंबर १ या प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षक वृंदाने बांधावरच्या शाळेतील एक दिवस नुकताच अनुभवला. या उपक्रमांतर्गत शेतीची लागवड कशी करावी, भात तरवा काढणी-लावणी, शेती अवजारांबद्दल माहिती, शेती विषयक असणाऱ्या अनेक गोष्टींची चर्चा प्रत्यक्ष बांधावर जाऊन विद्यार्थ्यांनी शेतमालकाशी केली. पारंपारिक शेतीतील अनेक अवजारे, आधुनिक शेतीची नवीन पद्धत, अवजारे याबाबत अनेक शंका विचारल्या गेल्या. यावेळी माजी सरपंच सौ लक्ष्मी पेडणेकर, सौ मसुरकर, शेतमालक श्री, अजित माडगूत, श्री. सावंत तसेच प्रशाला मुख्याध्यापिका सौ शर्वरी सावंत, श्री विनोद कदम, गुरुनाथ ताम्हणकर, गोपाळ गावडे, विनोद सातार्डेकर, रामेश्वरी मगर, ग्रामपंचायत कर्मचारी आदिजण उपस्थित होते. दिवसभर या उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थ्यांनी शेती विषयीचा अनुभव घेत माहिती घेतली. संस्कृती मसुरेकर, संचिता जाधव यांनी शेतक-यांची मुलाखत घेतली. प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान घेण्यात आले. हा अनुभव ज्या शेतकरी मालकांमुळे श्री. म्हाडगुतांमुळे मिळाला त्यांचेही त्या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात आले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)