ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
भारतीय जनता पार्टीला अभिप्रेत असणारे कार्य भटके विमुक्त आघाडीच्या वतीने करू कुडाळ येथील बैठकीत जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांचे प्रतिपादन..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भारतीय जनता पार्टीला अभिप्रेत असणारे कार्य भटके विमुक्त आघाडीच्या वतीने करू कुडाळ येथील बैठकीत जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांचे प्रतिपादन..!

प्रकाशन: 27 Jun 2022 06:27 PM
वाचन संख्या 106

बैठकीत संघटनात्मक निवडी केल्या जाहीर..!

कुडाळ | प्रतिनिधी :
भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक व संघटनात्मक निवडीचा कार्यक्रम 27 जून http://localhost/news/public/uploads/2022 रोजी भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांच्या प्रमुख उपस्थित कुडाळ येथील भाजपा कार्यालय येथे संपन्न झाला.

Article image

यावेळी नवलराज काळे बोलत असताना म्हणाले भारतीय जनता पार्टीचे नेते भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून भाजप भटके-विमुक्त आघाडीची स्थापना करण्यात आलेली असून या भटके-विमुक्त आघाडीच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब, भाजप भटके-विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार साहेब, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली साहेब, आमदार नितेशजी राणे साहेब निलेश जी राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी पक्षाला अभिप्रेत असणारे कार्य आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करून दाखवू व येणाऱ्या काळात पक्षाला मोठी ताकद निर्माण करू देऊ त्याचप्रमाणे या आघाडीच्यावतीने भटके विमुक्त जाती व जमाती मध्ये येणाऱ्या सर्व जातींसाठी त्यांच्या न्याय हक्कांसाठी, समाजावर होणाऱ्या अन्याय विरुद्ध लढा उभा करून समाजाला न्याय देण्याचे काम करू असे प्रतिपादन करत जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघांमध्ये काही महत्त्वाच्या संघटनात्मक निवडी नवलराज काळे व विनायक राणे यांच्या शुभ हस्ते नियुक्त पत्र देऊन जाहीर करण्यात आल्या यावेळी मालवण तालुका अध्यक्षपदी शांताराम उर्फ बाळा गोसावी, जिल्हा उपाध्यक्ष पदी कुडाळ तालुक्याचे सुरेश झोरे, तर जिल्हा सघटनमंत्री पदी मालवण तालुक्याचे सुनील खरात यांची निवड करण्यात आली. उपस्थितांकडून नवनियुक्त पदाधिकार्‍यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या या ठिकाणी इतर मान्यवर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी कुडाळ मंडळाचे अध्यक्ष विनायक राणे, भाजपा भटके-विमुक्त आघाडी धनगर समाज जिल्हाध्यक्ष दिपक खरात, भटक्या विमुक्त हक्क परिषद चे जिल्हाध्यक्ष शशिकांत इंगळे,गोंधळी समाजाचे नेते राजू इंगळे, नवनिर्वाचित मालवण तालुका शांताराम ऊर्फ बाळा गोसावी, नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष सुरेश झोरे, नवनिर्वाचित जिल्हा संघटन मंत्री सुनील खरात, मालवण शहर शक्ती केंद्रप्रमुख श्री पांजरी, राजाराम पाटील, विनोद मुंगेकर , हर्ष गावकर, रामचंद्र मसुरकर, शैलेश मळेकर, विवेक परब व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स