साळशी हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक पुरुषोत्तम साटम यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित...!
मुंबई शहर येथील सांस्कृतिक सभागृहात रविवार २६ जून रोजी बक्षीस वितरण सोहळा संपन्न…!
शिरगाव |संतोष साळसकर :
देवगड तालुक्यातील साळशी माध्यमिक विद्यामंदिर साळशी चे सहाय्यक शिक्षक पुरुषोत्तम त्रिंबक साटम यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांचा यंदाचा सन २०२२ चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षकरत्न पुरस्कार रविवार २६ जून रोजी मुंबई शहर येथील सांस्कृतिक सभागृहात राज्यस्तरीय गुनिजन गौरव महासंमेलनात जी/दक्षिण विभाग मुंबईच्या प्रशासकीय अधिकारी(शाळा) श्रीमती वर्षा गांगुर्डे यांचे हस्ते मनाचा फेटा,मानकरी बॅच,सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,गौरवपत्रक आणि महावस्त्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी राज्यातील सर्व जिल्ह्यातील २५ क्षेत्रातून पुरस्कारासाठी निवडलेल्या ५१ मानकरी यांना या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.
१९९९ साली स्थापन झालेल्या या गुनिजन संस्थेचा हा २२ वा पुरस्कार सोहळा होता. या सोहळ्याला आंध्र प्रदेश येथील इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन डॉ.जयलक्ष्मी सानिपिना राव या ऑनलाईन उपस्थित होत्या तर महापरिषद समन्वयक प्रकाश सावंत,समाजसेविका सौ. मीनाक्षी गवळी,स्वागताध्यक्ष एल. एस. दाते, मानद सल्लागार शशिकांत सेलुकर,चंद्रहास गावंड,अमोल सुपेकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन सौ. मनीषा कदम यांनी केले.
पुरुषोत्तम साटम हे २०१८ पासून गेली ६ वर्षे साळशी हायस्कूल मध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून शिक्षण सेवा बजावित आहेत. साधी रहाणी पण उच्च विचारसरणी,सतत हसरा चेहरा,सतत विद्यार्थ्यांमध्ये मिळूनमिसळून त्यांना उत्तम ज्ञान देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. ते साळशी हायस्कूल मध्ये विज्ञान आणि मराठी हे विषय शिकवत असले तरी त्यांच्याकडे एक उत्तम क्रीडा शिक्षक आणि सांस्कृतिक विभागाचे ही काम ते उत्तमप्रकारे पार पाडत आहेत. यंदा या हायस्कूल चा दहावीचा निकाल १०० टक्के लागला त्यात त्यांचेही योगदान मोलाचे आहे. ते एक उत्तम सूत्रसंचालक आणि मृदंगवादक म्हणूनही प्रसिद्ध आहेत.त्यांच्या या यशाबद्दल अण्णा मिराशी,जे. डी. नाईक, सरपंच वैभव साळसकर,उपसरपंच अनंत नाईक,भारतीय कामगार सेनेचे मुंबई चिटणीस प्रमोद गावकर, माजी प. स. सदस्य सुनील गावकर, माजी सरपंच तथा शाळा समिती चेअरमन सत्यवान सावंत, माजी सरपंच अनिल पोकळे, मुख्याध्यापक माणिक वंजारे आदींसह शिक्षकवर्ग, ग्रामस्थ,पालकवर्ग तसेच विविध स्तरातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)