सेवानिवृत्त ग्रामसेवकांसाठी पेन्शन अदालत २८ जुन रोजी..!
चिंदर | विवेक परब :
सेवानिवृत्त पेन्शन धारकांची पेन्शन अदालत मंगळवार दिनांक २८ जुन रोजी ठीक ११ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांनी आयोजित केली आहे. सदरच्या पेन्शन अदालत, जिल्हा ग्रामसेवक संघटना अध्यक्ष प्रकाश राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यासाठी सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी उपस्थित राहावे. असे ग्रामसेवक संघटणेचे, सचिव हनुमंत प्रभु यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
या पेन्शन अदालत नंतर दुपारी ठीक १२ वाजता ग्रामसेवक भवन ओरोस, येथे सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार असल्याने, सर्वांनी वेळीच उपस्थित राहावे असे आवाहन, संघटणेच्या वतीने सचिव एच. बी. प्रभु यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)