वाडीवरवडे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने आरोग्यसेविका सौ. वालावलकर यांचा सन्मान..!
वाडीवरवडे | प्रतिनिधी :
कुडाळ तालुक्यातील वाडीवरवडे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने आरोग्यसेविका सौ. वालावलकर यांचा गावासाठी केलेल्या सेवेबद्दल सन्मान करण्यात आला. तसेच नवीन रुजू झालेल्या आरोग्यसेविका सौ. टेमकर यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास सरपंच, ग्रामसेविका, कृषी सहाय्यक सौ. आजगावकर, आरोग्य सेवक श्री मस्के, ज्येष्ठ ग्रामस्थ दाजीकाका, सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ दामले यांनी आपल्या मनोगतातून आरोग्यसेविका सौ. वालावलकर यांच्या कार्याचे कौतुक करून आभार मानले. पाच वर्ष सदैव हसतमुख चेहऱ्याने गावाची आरोग्य सेवा बजावणाऱ्या वालावलकर यांना मात्र आज गहिवरुन आले. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केलेल्या सत्काराबद्दल त्यांनीही सर्वांचे आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)