चिंदरच्या शाळकरी मुलींचा असाही प्रामाणिकपणा..!
चिंदर/विवेक परब :
आधुनिक युगात विश्वास, प्रामाणिकपणा संपत चाललेला असतानाच चिंदर लब्देवाडी येथील भक्ती चेंदवनकर व नम्रता लाड या शाळकरी मुलींनी शाळेतून येताना मिळालेला मोबाईल मूळ मालकाचा शोध घेत परत केला आहे. भक्ती हिला सापडलेला मोबाईल तिने आपल्या पालकांकडे दिला. मोबाईल पावसात भिजल्याने व चार्जिंग संपल्याने बंद झाला होता. पालकांनी मोबाईल चालू झालानंतर तो मोबाईल आदित्य कावले यांचा असल्याचे निष्पन्न झाले. मोबाईल भक्ती हिच्या हस्ते आदित्य कावले यांना सुपूर्द करण्यात आला. शाळकरी मुलींच्या या प्रामाणिक पणा बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)