<em>कलाकार जगला तर कला जिवंत राहील..!!..सहदेव धर्णे.</em>
शनिवार दि. ४ जून, २०२२ रोजी ‘दशावतार कलाकारांचा जाहिर मेळावा’..!!
सोमेश्वर कलामंचाचे आयोजन..!!
कुडाळ । देवेंद्र गावडे
मंगळवार । ३१ मे २०२२
श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था आयोजित ‘गराजलो रे गराजलो’ या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्षात १५ मुद्दे घेऊन नि:स्वार्थीपणे ‘गराजलो रे गराजलो एक चळवळ’ सुरू करण्यात आली आणि या चळवळी अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येऊ लागले.
त्याच अनुषंगाने गतवर्षी दशावतारी कलाकारांचा आणि दशावतारी मंडळांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
कलाकार जगला तर कला जिवंत राहील..या धोरणावर आधारीत ही चळवळ सुरू केल्याचे श्री सोमेश्वर कलामंच या संस्थेचे संस्थिपक अध्यक्ष श्री. सहदेव धर्णे सांगतात.
दशावतार नाट्यकलावंतांसाठी पूढील मुद्द्यांवर आधारीत हा मेळावा असणार आहे :-
🔸दशावतारी कलाकारांच्या आरोग्याविषयी आरोग्य शिबीर राबविण्यात येणार आहे.
🔸 भविष्याचा विचार करून यापुढे दशावतारी कलाकारांना रोजगार मिळाला पाहिजे. त्यांची आर्थिक स्थिती चांगली झाली पाहिजे. यासाठी संकल्पना मांडण्यासाठी.
🔸 दशावतारी नाट्यप्रयोग सादर करताना उद्भवणाऱ्या समस्या उदा.माईक सिस्टीम समस्येमुळे त्यांच्या आवाजावर परिणाम होतो. यावर तोडगा काढण्यासाठी.
शनिवार दिनांक-०४ जुन २०२२ रोजी सकाळी -१०.०० वाजता, चैतन्य मंगल कार्यालय, मालवण नेरूरपाररोड,नागदा मारुती मंदिर जवळ कुडाळ येथे ‘दशावतारी जाहीर मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.
तरी सर्व दशावतारी कलाकारांनी आवर्जून उपस्थित रहावे आवाहन संबंधीत दशावतार कलावंतांना संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
सारं काही तुमच्यासाठी..तुमच्या उज्वल भविष्यासाठी…निस्वार्थीपणे
कार्य करत राहणार..फक्त आम्हाला साथ द्या..असे देखील संस्थेच्यावतीने दशावतार नाट्यकलावंतांना कळविण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)