ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
<em>शिवसेनेला आम.नितेश राणे यांनी वैभववाडीत दिला जोरका धक्का; माजी सभापती अंबाजी हुंबे यांचा भाजपात प्रवेश..!</em>
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

<em>शिवसेनेला आम.नितेश राणे यांनी वैभववाडीत दिला जोरका धक्का; माजी सभापती अंबाजी हुंबे यांचा भाजपात प्रवेश..!</em>

प्रकाशन: 31 May 2022 08:49 AM
वाचन संख्या 70

कुर्ली पंचक्रोशीत शिवसेनेला भगदाड..!

राणेंच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास झाला आणि भविष्यात होईल -हुंबे.

वैभववाडी | नवलराज काळे : भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षाला वैभववाडी तालुक्यात फार मोठा धक्का दिला आहे. वैभववाडी चे माजी सभापती आणि कुर्ली गावचे उपसरपंच अंबाजी हुंबे यांनी भारतीय जनता पार्टीत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने वैभववाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात शिवसेनेला खिंडार पडले आहे.हा पक्ष प्रवेश ओमगणेश निवास स्थानी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपा ची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीत प्रवेश करते वेळी आंबाजी हुंबे यांच्या सोबत गणेश शेळके, महेंद्र झोरे, दत्ताराम हुंबे,दीपक कोकरे,संदेश पवार,सचिन हुंबे,वैभव पवार,समीर चव्हाण,प्रकाश पवार,भगवान तेली,अजित हुंबे,गणेश तेली यांच्या सह असंख्ये कार्यकर्ते भाजपा मध्ये प्रवेश कर्ते झालेत. या प्रवेशावेळी वैभववाडी भाजपा तालुका अध्यक्ष नाशिर काझी, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे,जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे,शक्ती केंद्रप्रमुख रितेश सुतार,हुसेन लांजेकर,कुर्ली ग्रामपंचायत सदस्य सूरज तावडे,आदी उपस्थित होते.
दरम्यान पक्ष प्रवेशानंतर बोलतांना अंबाजी हुंबे म्हणाले,शहर आणि ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी राणेंच्या नेतृत्वाची गरज आहे.वैभववाडी च्या एकूणच विकासात केंद्रीय मंत्री नारायण राणे,आमदार नितेश राणे यांचे फार मोठे योगदान आहे.भविष्यात सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी च्या गावागावात विकास गंगा नेली जाईल. राणेंचे नेतृत्वच विकास करेल म्हणूनच आम्ही शिवसेना सोडली असल्याचे असल्याचे श्री हुंबे यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स