पालिका निवडणुकीसाठी एक सदस्यीय वॉर्ड पद्धत
मालवण | प्रतिनिधी : यंदाच्या निवडणुकीत एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बहु सदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करण्यात आली आहे. प्रारूप प्रभाग रचनेत २०११ ची लोकसंख्या विचारात घेऊन ६ फेब्रुवारी २०२०च्या निर्देशानुसार परिच्छेद ४ नुसार सदस्य संख्या निश्चित करून तितक्या प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा बनवायचा आहे. हा आराखडा तयार करताना राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे पालन करायचे आहे. पालिकानी कच्चा आराखडा पूर्ण होताच त्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाला तात्काळ कळवणे गरजेचे आहे. यामध्येच २४ ऑगस्ट रोजी राज्य निवडणूक आयोग जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांची ऑनलाइन बैठ होणार आहे असे समजत आहे. राज्य निवडणूक आयोगाचे उपयुक्त अविनाश सणस यांच्या स्वाक्षरीने अध्यादेश शुक्रवारी काढण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नगरपालिकांची मुदत डिसेंबर २०२१ मध्ये संपत आहे.
दरम्यान , सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण , सावंतवाडी , वेंगुर्ले , या ३ नगरपालिकांचि मुदत डिसेंबर २०२१ मध्ये संपत आहे. तर कुडाळ नगर पंचायतीची मुदत या आधी संपली असल्याने या चारही ठिकाणी एकच वेळी निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)