१०१ रुपयांत श्री गणेश मूर्ती..!
खासदार डाॅ श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा उपक्रम
पोईप | ओंकार चव्हाण : आर्थिक मंदी आणि कोरोनाच्या सावटाखाली जगत असलेल्या सामान्य डोंबिवलीकर माणसांना आता केवळ १०१ रुपये इतक्या नाममात्र किंमतीत बाप्पांची मूर्ती मिळणार आहे.
कल्याणचे खासदार डाॅ श्रीकांत एकनाथ शिंदे आणि शिवसेना डोंबिवलीच्या मध्यवर्ती शाखेने हा उपक्रम जाहीर केला आहे.
श्री गणेश चतुर्थी हा तमाम महाराष्ट्रातील सामान्य जनांचा एक अत्यावश्यक आस्थेची धार्मिक परंपरा असल्याने ती सामान्य जनांसाठी निर्विघ्नपणे पार पाडण्यात हातभार लागावा म्हणून हा उपक्रम सुरु करण्यात अल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले आहे.
महत्वाचे म्हणजे या सर्व गणेश मूर्ती ह्या इकोफ्रेंडली किंवा पर्यावरणपूरक आहेत.
मूर्तीसाठी नोंदणी करायची सुरुवात २२/०८/२०२१ पासून डोंबिवली मानपाडा रोडवरील शिवसेनेच्या मुख्य शाखेमध्ये होत आहे. प्रथम नोंदणीस प्रथम प्राधान्य असल्याचे डोंबिवली मध्यवर्ती शिवसेना शाखेतर्फे आणि शहरप्रमुख श्री राजेश गोवर्धन मोरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
तत्पुर्वी खासदार डाॅ श्रीकांत एकनाथ शिंदे व डोंबिवली शिवसेना यांनी नुकतीच कोकणात जाणार्या चाकरमान्यांसाठी मोफत बससेवेची घोषणाही केली आहेच.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)