रत्नागिरी - सिंधुदुर्गच्या रस्त्यांचे डागडुजीकरण लवकरच ; अधिक्षक बांधकाम अभियंता छाया नाईक
रत्नागिरी । प्रतिनिधी : प्रत्येक जिल्ह्यात पावसामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसामुळे मोठ्याप्रमाणात रस्त्याचे नुकसान झाले असून पूरपरिस्थिती मुळे चिपळूण व खेडगला मोठया प्रमाणात फटका बसला आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्गातील रस्ते चांगले व्हावेत यासाठी परिपूर्ण आराखडा मंत्रिमंडळा कडे पाठविण्यात आला होता. त्यातील १६६८ किलोमीटरला शासनाकडून निधी मंजूर झाला असून ५५ कामे सुरु करण्याच्या दृष्टीने लवकरच निविदा काढल्या जाणार असल्याचे रत्नागिरी – सिंधुदूर्ग जिल्हयाच्या अधिक्षक बांधकाम अभियंता छाया नाईक यांनी सांगितले.
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात रस्ते खराब झाले असून त्यासाठी नाबार्डकडून मंजूर कामाची निविदा दोन्ही जिल्हे मिळून १६६८ किलोमीटरची कामे केली जाणार असून ५५ कामे झाली आहेत. नाबार्ड आणि बांधकाम विभागाकडून् ७८ कामाच्या निविदा काढल्या जाणार असल्याचे अधिक्षक छाया नाईक यांनी सांगितले. यामध्ये चिपळूण खेडलाही प्राधान्य देण्यात आले असून नवीन रस्ते, पूल यांचाही समावेश आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)