ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>खा. अनिल देसाई यांच्या उपस्थितीत उद्या कुडाळ येथे शिवसंपर्क अभियान भव्य मेळावा..!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>खा. अनिल देसाई यांच्या उपस्थितीत उद्या कुडाळ येथे शिवसंपर्क अभियान भव्य मेळावा..!</em>

प्रकाशन: 26 May 2022 07:07 PM
वाचन संख्या 28

चिंदर | विवेक परब-
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसंपर्क अभियान प्रमुख, खासदार अनिल देसाई यांची प्रमुख उपस्थिती असणार असून कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचा मेळावा उद्या शुक्रवार दि. २७ मे २०२२ रोजी कुडाळ शहरातील सिद्धिविनायक हॉल येथे सकाळी ११ :०० वाजता होणार आहे.
यावेळी शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री ना. उदय सामंत, माजी राज्यमंत्री आ.दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष समन्वयक प्रदीप बोरकर,शिवसेना जिल्हाप्रमुख कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्ष संदेश पारकर, शिवसेना नेते सतीश सावंत, अतुल रावराणे, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट हे उपस्थित राहणार आहेत.
तरी कुडाळ येथील मेळाव्याला शिवसेना ,युवासेना, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य,व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स