<em>भाजप ग्रामीण मंडल अध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका..!</em>
चिंदर | विवेक परब :
खोटी आश्वासणे आणि वाटलेली पत्रे एकत्र केली तर कलम 420 चा पर्वत तयार होईल. प्रश्न राहिला देवबाग बांधाऱ्याचा. वैभवजी नाईक साहेब आपण आपल्याच अंतर आत्म्याला विचारा की एखाद्या खासदार आमदारांनी जर आपल्याला निधी दिला आणि प्रशासकीय मंजुरी झाली तर वर्क ऑर्डर कोण देणार? आणि जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथे राजकारण कसलं करता? असा सवाल भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी उपस्थित केला आहे.
आणि एवढं खालच्या थराच राजकारण हे कशाचं ध्योतक आहे? तुम्ही क्रोसेक्शन सर्वेचे पैसे आम्ही ओरडून ओरडून भरले मग ते सर्वेक्षण पूर्ण झाल्याशीवाय तळाशील आणि देवबागचे केंद्र स्थरावरील मंजुरीच काय होणार ते पण जनतेला सांगा? का उगाच लोकांची दिशाभूल करून जनतेच्या जीवाशी खेळत आहात? आमची तुम्ही आमदार आणि सत्ताधीश म्हणून विनंती आहे की हे जनतेच्या जीवाशी खेळणे थांबवा. मा. नारायणराव राणे साहेब केंद्रात मंत्री आहेत तुम्ही आमदार आहात एकदा विकासाच्या मुद्यावर त्यांना भेटा त्यांच्याशी बोला आणि सर्व सामान्य जनतेशी आपली बांदिलकी असेल तर उध्वजींच्या दडपणा खाली किंवा खासदार राऊत यांच्या दडपनाखाली न येता राणे साहेबांन सोबत बसा आणि यातून मार्ग काढा राणे साहेब केवळ ते खासदार आहेत किंवा मंत्री किंवा विरोधी म्हणून न बघता प्रशासनातील अनुभवी म्हणून भेटा ते योग्य मार्गदर्शन करतील.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)