ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
देवी भवानी माता मंदिराचा ४था वर्धापन दिन सोहळा..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

देवी भवानी माता मंदिराचा ४था वर्धापन दिन सोहळा..!

प्रकाशन: 25 May 2022 09:33 AM
वाचन संख्या 49

कुडाळ तालुक्यातील नेरूर-गोंधयाळे येथे शुक्रवार, दिनांक २७ मे, २०२२ रोजी भव्य आयोजन..!

कुडाळ । देवेंद्र गावडे
बुधवार । २५ मे २०२२ :-

प्रतिवर्षीप्रमाणे कुडाळ तालुक्यातील नेरूर-गोंधयाळे येथील देवी भवानी माता मंदिराचा ४था वर्धापन दिन सोहळा शुक्रवार, दि. २७ मे, २०२२ रोजी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे.

सर्वप्रथम सकाळी ८ ते ९ वा. या वेळेत श्री देवी भवानी मातेची विधिवत पूजा व अभिषेक करण्यात येईल.

त्यानंतर सकाळी ९ ते १०.००वा. महिला कुंकूमार्चन व अभिषेक होईल.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्यानारायण महापूजेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. ही महापूजा स. १०.००ते दू. १२.३० या दरम्यान संपन्न होईल.

महाप्रसाद दू. १२.३० ते ३.०० या वेळेत असेल.

सायंकाळी ४.०० वाजल्यापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरूवात होईल. यामध्ये स्थानिकांची भजने, लहान मुलांचे रेकाॅर्ड डान्स इत्यादि कार्यक्रमांचा आस्वाद भाविकांना घेता येईल.

त्याचबरोबर रात्रौ ठीक ९.०० वा. वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ, तेंडोली यांचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे.

तरी सर्व भाविकांनी, नाट्यरसिकांनी या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री भवानी मित्र मंडळ, नेरूर-गोंधयाळेच्यावतीने मंडळाचे क्रियाशील सदस्य श्री. राम कांबळी यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स