<em>भाजपा दिंव्याग आघाडी जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा भाजपाच्या वतीने शुभेच्छा…!</em>
चिंदर | विवेक परब :
सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा दिंव्याग आघाडी जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा भाजपाच्यावतीने महिला प्रदेशाध्यक्षा सौ.उमाताई खापरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या .कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित ऑनलाईन प्रदेश बैठकीस जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते, यावेळी जिल्हा भाजपा च्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, महिला प्रदेश उपाध्यक्षा निलम गोंधळी, महिला प्रदेश का.का.सदस्या प्रज्ञा ढवण, संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत, वैभववाडी नगराध्यक्षा नेहा माईणकर, सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, सरचिटणीस अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष संजु परब, जिल्हा बॅंक संचालक महेश सारंग तसेच जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)