ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पदभार स्विकारताना..
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पदभार स्विकारताना..

प्रकाशन: 22 May 2022 06:23 PM
वाचन संख्या 143

उप’संपादकिय’ । मनोगत

आज पत्रकारीतेच्या क्षेत्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अग्रणी असणा-या आपली सिंधुनगरी या न्यूज चॅनेलच्या उपसंपादक या पदावर कार्यरत होत असताना मला फार आनंद होत आहे.

आपली सिंधुनगरी या न्यूज चॅनेलचे सर्वेसर्वा तथा संपादक सन्मा. श्री. सुयोग पंडीत सर यांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवून जो विश्वास दाखवला आहे, त्याला पूर्णपणे न्याय देण्याचा व ही जबाबदारी यशस्विरित्या पार पाडण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन.

..आपली सिंधुनगरी..माध्यम जे जपते सिंधुदुर्गची संस्कृती..!!

असे ब्रीदवाक्य-टॅगलाइन घेऊन कार्यरत असणारे आपली सिंधुनगरी हे एकमेव न्यूज चॅनेल आहे.

पत्रकारीता म्हणजे घीसडघाई, पत्रकारीता म्हणजे चटपटी बातम्या, पत्रकारीता म्हणजे टीआरपी, पत्रकारीता म्हणजे व्हिवर्स..इत्यादिच्या पलिकडे जाऊन कार्यरत असणारे हे चॅनेल आहे, हे सांगताना फार अभिमान वाटतो.

सवंग प्रसिद्धीच्यामागे न पळता समाजाच्या सर्व क्षेत्रांना समान न्याय देण्याचा किंबहूना त्यातील ख-या पण दुर्लक्षित राहीलेल्या घटकांवर प्रकाश टाकण्याचं कार्य आज अविरतपणे आपली सिंधुनगरी चॅनेल करत असते..करत राहील.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची खरी ओळख म्हणजे त्याचा सांस्कृतिक वारसा.. पण त्याचबरोबर इतर सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक, वैज्ञानिक, शेतकिय, औद्योगिक इत्यादि सर्वच क्षेत्रांमध्ये देखील आपल्या जिल्ह्याने मोठ्ठी भरारी घेतली आहे.

आपली सिंधुनगरी चॅनेल या सर्वच क्षेत्रातली सकारात्मक बातमी आजवर पोहचवत आलेले आहे.

इथून पूढे देखील आपली सिंधुनगरी चॅनेल सिंधुदुर्गवासियांची नजर व कान बनून वावरणार आहे.

ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे म्हणतात कोणत्याही क्षेत्रातल्या अनिष्ठ बाबींवर उपाय एकच..इष्ट बाबी..चांगल्या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे करत रहाणे..!!

समृद्ध सिंधदुर्गाचा समृद्ध वारसा जपण्यासाठी व त्याच्या प्रसारासाठी..आम्ही सदैव कटीबद्ध आहोत..!!

==/==/===

देवेंद्र गावडे.
उपसंपादक,
आपली सिंधुनगरी.
कुडाळ, सिंधुदुर्ग.

==/==/===== ◼️◼️

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स