ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
'अथक आमदार वैभव नाईक' यांचा लोककलेचा आदर..! (विशेषवृत्त)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

'अथक आमदार वैभव नाईक' यांचा लोककलेचा आदर..! (विशेषवृत्त)

प्रकाशन: 18 May 2022 10:35 AM
वाचन संख्या 63

रात्री २ वाजता आमदार वैभव नाईक यांनी केले देवदर्शन आणि साजरा केला दशावतारी कलाकार दादा राणे कोनसकर यांचा वाढदिवस.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व कोकणातील आस्थेची कला असलेल्या दशावतारात आदराचे व आघाडीचे असलेले मास्टर दादा राणे कोनसकर यांचा वाढदिवस, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पोईप येथे रविवारी रात्री २ वाजता साजरा करण्यात आला.

Article image


यावेळी आमदार वैभव नाईक यांनी दादा राणे कोनसकर यांची प्रशंसा केली. त्यांना केक भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मध्यरात्री देखील अथक आमदार वैभव नाईक यांनी दशावतारी कलाकारासाठी वेळ दिल्याने दशावतारी कलाकारांवरील त्यांचे प्रेम व आदर पुन्हा अधोरेखीत झाले.

Article image

पोईप येथील श्री.देव वेताळ मंदिराच्या वर्धापन दिन सोहळ्याला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी रविवारी रात्री उपस्थित राहून देव दर्शन घेतले. वर्धापन दिनानिमित्त लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर यांचा अजिंक्य तारा दशावतारी नाट्य प्रयोग सुरु होता. त्यादरम्यानच दादा राणे कोनसकर यांचा वाढदिवस असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांना समजली. रंगमंचावर संगीतमय वादनाच्या साथीने केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आमदार वैभव नाईक हे नेहमीच दशावतारी कलाकारांना सहकार्य करतात याची आठवण करून देत दशावतारी नाट्यमंडळाने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली .

यावेळी शिवसेनेचे पंकज वर्दम,शिवरामपंत पालव, बाळा सांडव, पोईप गावचे प्रमुख मानकरी परशुराम नाईक, दत्ताराम पालव, बबली पालव, गोपीनाथ पालव, विठ्ठल नाईक, श्री. तावडे, दशावतारी कलाकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष http://localhost/news/public/uploads/2022 च्या सामाजिक , सांस्कृतिक नियोजनावर गेले पंधरा दिवस अथक लक्ष दिलेले कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी एवढ्या व्यस्ततेतूनही ग्रामीण भागातील मंदिराच्या सोहळ्याला व लोककलावंतांना दिलेला वेळ सध्या कला व सामाजिक स्तरावर प्रशंसेचा विषय ठरत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स