साळशी येथील समस्त तेली समाज बांधवाच्या भवानी गोंधळ, होम हवन विधींच्या कार्यक्रमाचे आयोजन..!
१८ मे ते २० मे दरम्यान संपन्न होणारा सात्विक सोहळा..
शिरगांव |संतोष साळसकर :देवगड तालुक्यातील साळशी – तेलीवाडी येथील समस्त तेली समाज बांधव साळशी यांच्यातर्फे बुध. १८ मे ते २० मे पर्यंत तेली समाज बांधवांचा वार्षिक होम व भवानीचा जागरण गोंधळ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या भक्ति सोहळ्याला सर्व तेली ज्ञाती बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार,नातेवाईक मित्रमंडळीसह उपस्थित रहायचे आवाहन करण्यात आले आहे.
गावातील सर्व ग्रामस्थ, बारा – पाच मानकरी यांनी या सोहळ्याला विशेष उपस्थित राहावे असे विनम्र आवाहन समस्त तेली समाज साळशी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)