हार्मोनियमवादन परिक्षेमध्ये चौके गावची कन्या तृप्ती संतोष गावडे हिचे सुयश..!
चौके | अमोल गोसावी : अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडल,मुबंई यांच्यावतीने कुडाळ या ठिकाणी घेण्यात आलेल्या हार्मोनियमवादक परिक्षेमध्ये चौके गावची कन्या तृप्ती संतोष गावडे हिने प्रथम श्रेणी मिळवून यश संपादन केले.या यशाबद्दल तृप्ती गावडे हिचे चौके पंचक्रोशीमधून अभिनंदन होत आहे.
मालवण येथील टोपीवाला हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असलेली तृप्ती मालवण मधील प्रसिध्द गायक ॲड.दिलिप ठाकूर यांच्याकडे शास्त्रीय गायन व हार्मोनियम शिक्षण घेत आहे. तृप्तीने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)