ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
एम क्रिकेट ॲकॅडमी आयोजीत साखळी स्पर्धेला सुरवात.

एम क्रिकेट ॲकॅडमी आयोजीत साखळी स्पर्धेला सुरवात.

प्रकाशन: 04 May 2022 10:53 AM
वाचन संख्या 385

ज्येष्ठ खेळाडू पपू परब यांच्या हस्ते झाले उद्घाटन...!

मालवण माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर,माजी नगरसेवक दीपक पाटकर, बांदा सरपंच अक्रम ख़ान यांची विशेष उपस्थिती.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या एम क्रिकेट ॲकॅडमीच्या ’14 वर्षांखालील’ लेदरबाॅल क्रिकेटच्या साखळी स्पर्धेला मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवर आज सुरवात झाली.

Article image
Article image

या स्पर्धेत सांगली,रत्नागिरी,गोवा,सावंतवाडी येथील चार क्लब्ज सहभागी झाले आहेत. सात दिवस चालणार्या या स्पर्धेतील सर्व सामने मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड वर होणार आहेत.

Article image
Article image
Article image

या स्पर्धेचे उद्घाटन मालवणचे ज्येष्ठ लेदरबाॅल अष्टपैलू श्री पपू परब यांनी केले.


यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर,माजी नगरसेवक दीपक पाटकर,जिल्हा बॅन्क संचालक बाबा परब, बांदा सरपंच अक्रम ख़ान,ज्येष्ठ स्वींग गोलंदाज नंदू देसाई,सुप्रसिद्ध उद्योजक परशुराम पाटकर, धुरी,पपू ,शंकर पराडकर,समालोचक शाम वाककर, एम ॲकॅडमीचे अध्यक्ष उदय नाईक , नीळकंठ मालंडकर, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष व बांदा ग्रामपंचायत सदस्य जावेद ख़ातिब, सचिन सावंत,राहुल रेगे,टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड पदाधिकारी गोविंद ऊर्फ बंटी केरकर आप्पा मालंडकर, संजय राऊत
व इतर मान्यवर व खेळाडू उपस्थित होते.

Article image
Article image
Article image

यावेळी मालवणचे माजी नगराध्यक्ष व शैलीदार फलंदाज महेश कांदळगांवकर व बांदासरपंच अक्रम ख़ान यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले.

Article image
Article image

श्री उमेश,श्री एम्रोस आल्मेडा व श्री दीपक धुरी हे स्पर्धेतील तीन प्रमुख पंच असून गुणलेखनाची जबाबदारी श्री गोविंद ऊर्फ बंटी केरकर सांभाळतील.

एम ॲकॅडमीच्या या स्पर्धेतील उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन मालवण स्पोर्टस् क्लबच्या श्री नंदू देसाई यांनी केले तर बांदा सरपंच व एम ॲकॅडमीचे उपाध्यक्ष व बांदा सरपंच अक्रम ख़ान यांनी उपस्थित खेळाडू,प्रशिक्षक,टोपिवाला बोर्डिंग ग्राउंड,मालवण स्पोर्टस् क्लब ,श्री जयंत गवंडे व इतर सहकारी आणि मान्यवरांचे आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स