ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवणात शिवसेनेतर्फे छत्रपती शिवजयंती साजरी.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणात शिवसेनेतर्फे छत्रपती शिवजयंती साजरी.

प्रकाशन: 02 May 2022 10:01 PM
वाचन संख्या 86

मालवण शिवसेना शाखा परिसर रंगला शिवरंगाने..!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात शिवसेनेच्या वतीने आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.

Article image
Article image


यावेळी मालवण शिवसेना शाखा येथे सर्व नागरीकांसाठी सत्यनारायणाची महापूजा आयोजीत करण्यात आली .
आमदार वैभव नाईक या सोहळ्याला विशेष उपस्थिती होते.

Article image
Article image

शिवसेना शाखेचा परिसर
असंख्य शिवसैनिकांनी भगवामय झाला होता. भगवे सदरे,फेटे आणि साड्या यांनी प्रत्येक शिवप्रेमी रंगून गेला.

Article image
Article image

शिवसेना शाखेतील या सोहळ्याला मालवण शहर व मालवण तालुका परिसर ग्रामपंचायत क्षेत्रातील शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

यानंतर छत्रपती शिवराय शोभायात्रा व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले . स्वराज महिला ढोलपथक हे या सोहळ्यात विशेष सांस्कृतीक आकर्षण होते. शिवसेना शाखा,भरड,बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळ अशी शिवजागर मिरवणूक देखिल काढण्यात आली.

Article image

यावेळी आमदार कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक नितीन राऊळ ,मालवणचे माजी बांधकाम सभापती व नगरसेवक श्री यतीन खोत व माजी बांधकाम सभापती व नगरसेवक मंदार केणी,तालुकाप्रमुख हरी खोबरेकर , स्वराज महिला ढोल पथकाच्या संस्थापक अध्यक्ष,
समाजसेविका व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष व शिवप्रेमी सौ.शिल्पा यतीन खोत ,भाई कासवकर, यशवंत गांवकर,बाळू नाटेकर, किसन मांजरेकर,शिवसेना पदाधिकारी किरण वाळके, उपविभाग प्रमुख सन्मेष परब, गणेश कुडाळकर, माजी नगरसेवक पंकज सादये ज्येष्ठ पदाधिकारी बबन शिंदे,माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, आतु फर्नांडीस , शामू झाड, युवासेना शहर अध्यक्ष मंदार ओरसकर, विशेष कार्यकारी दंडाधिकारी तपस्वी मयेकर ,प्रसाद आडवणकर,
कुंभारमाठ सरपंच भोगावकर, पृथ्वीराज जोगी,काली ऊर्फ दिलीप परब,मोहन मराळ , रवि तळाशिलकर,दत्तगुरु पोईपकर ॲड.रोहीत पालव,ॲड.पलाश चव्हाण व असंख्य शिवसैनिक, स्थानिक छत्रपती शिवप्रेमी व इतर मान्यवर उपस्थित होते.

मालवण बाजारपेठेत येथून मिरवणुक काढण्यात आली. स्वराज्य महिला ढोलपथकाच्या संस्थापक सौ.शिल्पा यतीन खोत यांच्यासह प्रतिभा चव्हाण,रुपाली कुडाळकर,राजनंदिनी कुडाळकर,छाया दंडी,अंजना सामंत,सुनैना वस्त,ॠतुजा वस्त आणि इतर सदस्यांचा सक्रीय सहभाग होता.

मिरवणुक संपल्यानंतर शिवसेना शाखेच्या पटांगणात सत्यनारायणाच्या पूजेला येणार्या स्थानिकांची रीघ लागलेली होती.
आमदार वैभव नाईक प्रमुख कार्यक्रमानंतरही शाखेच्या पटांगणात थांबून नागरिकांशी संवाद साधत होते. कार्यकर्ते व शिवसैनिक यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करत होते. या संपूर्ण कार्यक्रम व्यस्तता आणि व्यवस्थेत मालवणचे शिवसेना नगरसेवक आणि युवा पदाधिकारी यांच्याशी आमदार वैभव नाईक यांचा संवाद होता.
मालवणचे उपशहरप्रमुख किसन मांजरेकर यांचा वाढदिवसही याच दरम्यान साजरा केला गेला.
आमदारांच्या सहभागाने राजकीय दृष्ट्याही शिवसेना शाखेचा संपूर्ण परिसर संपूर्ण शिवसेनामयही झाला होता अशी उपस्थितांची प्रतिक्रिया होती.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स