पद्मश्रींनी निमंत्रित केलेय गुढीपूर पिंगुळीत…!
आज विश्राम ठाकर आदिवासी कलाअंगण चॅरिटेबल ट्रस्टचा १६ वा वर्धापनदिन सोहळा.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्यातील ठाकर आदिवासी समाजाची लोककला साता समुद्रापार घेऊन जाणारे लोककलाकार पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे यांच्या ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालयला १६ वर्ष पूर्ण होत आहेत. कला आंगण चे सर्वेसर्वा श्री परशुराम गंगावणे यांना http://localhost/news/public/uploads/2021 साली पद्मश्री या सर्वोच नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संग्रहालयाचा वर्धापनदिन साजरा पिंगुळी येथे विविध कार्यक्रमांनी होत आहे.
त्यानिमित्त कला आंगण महोत्सव http://localhost/news/public/uploads/2022 चे विशेष आयोजन करण्यात आले
सकाळी ११ ते १ वा. ठाकर समाजाचा वधु-वर सुचक पालक मेळावा संपन्न होणार आहे.
कला आंगण महोत्सवाचे स्वरुप खालील प्रमाणे आहे.
दुपारी ३ वा. चित्रकथी चित्रशैली कार्यशाळा (पद्मश्री २०२१ परशुराम विश्राम गंगावणे)
सायं. ४ वा. रांगोळी कार्यशाळा ( रांगोळी पोट्रेट)
सायं. ५ वा. टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु बनविणे कार्यशाळा
सायं. ५.३० वा. मातीचे मुर्तीकाम कार्यशाळा
सायं ६.३० ते ७.३० वा. खास
महिलांसाठी
होम मिनिस्टर स्पर्धा (आकर्षक बक्षिसे व गिफ्ट)
सायं. ७.३० वा. मान्यवरांचे हस्ते
उद्घाटन सोहळा
सायं. ७.४५ वा. कै. शरद गरुड स्मृती पुरस्कारचे वितरण तसेच कोरोना योध्दा पुरस्कार व अन्य सत्कार सोहळा
रात्री ८.३० वा. गुरुकृपा दशावतार लोककला नाट्यमंडळ, हळवल, कणकवली यांचा महान दशावतारी नाट्यप्रयोग मायाजाल या कार्यक्रमाला सर्वांनी
उपस्थित रहावे असे आवाहन पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी केले आहे.
ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम व आर्ट गॅलरी, पिंगुळी, गुढीपूर तर्फे सर्वांचे स्वागत करण्यात येत असल्याचेही त्यांनी माध्यमांद्वारे सांगितले आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी कला कार्यशाळा मोफत असून कार्यशाळेमधील सर्वांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येईल.
कार्यशाळा नोंदणीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
9987653909,9270743136
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)