कालानुरुप विकास कामांची रचना करुन पूर्तता करणे हेच लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे काम : आमदार वैभव नाईक
मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृहात स्वच्छता सन्मान सोहळा http://localhost/news/public/uploads/2022 ला आमदार वैभव नाईक व माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर ,मुख्याधिकारी संतोष जिरगे यांसह अनेक दिग्गजांची उपस्थिती.
मालवण | सुयोग पंडित : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मालवण नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता सन्मान पुरस्कार प्रदान सोहळा http://localhost/news/public/uploads/2022 चे उद्घाटन कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्याहस्ते झाले.यावेळी शहरातील विविध विकास कामांचा दृकश्राव्य आढावा घेण्यात आला. नगरपरिषदेमार्फत प्रस्तावीत कामे , चालू असलेली कामे आणि पूर्तता झालेले प्रकल्प यांची सखोल माहिती देण्यात आली.या वेळी बोलताना आमदार वैभव नाईक यांनी कालानुरुप विकास कामांची रचना करुन पूर्तता करणे हेच लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे मुलभूत काम असून स्वच्छता सन्मान http://localhost/news/public/uploads/2022 या उपक्रम सोहळ्याला सामान्य नागरीक,पत्रकार आणि नगरपरिषदेच्या स्वच्छता दूत व कर्मचारी तसेच अधिकार्यांनी दिलेल्या प्रतिसादाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
आमदार वैभव नाईक यांनी मालवण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांची प्रशंसा करुन त्यांना गेली पाच वर्षे सहकार्य करणार्या नगरसेवकांचे कौतुक केले.
माजी नगराध्यक्षमहेश कांदळगांवकर यांनी केलेली रचनात्मक विकास कामे ही टप्प्याटप्प्याने तथा कालबद्धपणे शहराला संपूर्ण सक्षम करण्यासाठी आखली होती हेच आज मालवणमधील प्रस्तावित मत्स्यालय, धुरीवाडा ते कोळंब व आडारीतील सुशोभिकरण ,कचरा व्यवस्थापन जागेतील सोयी, सौरऊर्जेचे प्रकल्प ,जलशुध्दीकरण पाणी पुरवठा प्रकल्प व इतर अनेक प्रकल्पांतून दिसून येते असे आमदार वैभव नाईक म्हणाले .
यावेळी मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनीही नगरपरिषदेची ध्येयधोरणे व नागरीकांच्या विकासाविषयी आराखडे व प्रकल्पांची माहिती दिली.यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक यांच्यासह मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर,माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर,माजी बांधकाम सभापती व नगरसेवक मंदार केणी, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,मुख्याधिकारी संतोष झिरगे, मालवण पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री नंदकिशोर महाजन, लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष श्री विश्वास गांवकर उपस्थित होते. उपस्थितांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर, शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी, मालवणचे नागरीक व पत्रकार महेंद्र पराडकर,कृष्णा ढोलम, भूषण मेथर,आप्पा मालंडकर,अमित खोत व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्वच्छता सन्मान प्राप्त यशस्वी स्पर्धकांना भरघोस रोख रक्कम व प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. आमदार वैभव नाईक,माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे, माजी बांधकाम सभापती व नगरसेवक मंदार केणी, माजी बांधकाम सभापती व नगरसेवक यतीन खोत व अन्य मान्यवरांनी सहभागी स्पर्धक व विजेत्यांचे अभिनंदन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)