ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
दांडी दणाणणार पर्यटनाने ; आमदार वैभव नाईक यांची घोषणा.

दांडी दणाणणार पर्यटनाने ; आमदार वैभव नाईक यांची घोषणा.

प्रकाशन: 01 May 2022 01:12 PM
वाचन संख्या 78

मालवणात 13 मे ते 15 मे कालावधीत भव्य पर्यटन महोत्सवाचे आयोजन ..

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणतल्या दांडी येथे भव्य पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज आमदार वैभव नाईक यांनी 13 मे ते 15 मे हा पर्यटन महोत्सव नयनरम्य दांडी येथे आयोजीत करण्यात येणार असल्याची घोषणा केली. मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.या महोत्सवाचे स्वरुप भव्य असेल व खासदार विनायक राऊत,पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह सर्वच क्षेत्रातील सेलिब्रिटी येथे उपस्थित राहून महोत्सवाचे आकर्षण ठरतील असेही त्यांनी स्पष्ट केले. या नगरपरिषद व नियोजन मंडळ द्वारा आयोजीत महोत्सवाद्वारे पर्यटनाला उर्जीतावस्था देताना स्थानिक कला कौशल्याला वाव मिळून आर्थिक सक्षमताही येईल असा महोत्सवाचा उद्देश असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी पत्रकारांना सांगितले .यावेळी त्यांच्यासोबत मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे व मालवण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष महेश , माजी नगरसेवक मंदार केणी,माजी नगरसेवक यतीन खोत, किरण वाळके ,शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स