मालवण तहसीलदार कार्यालयात आमदार वैभव नाईक यांचे ध्वजारोहण .
मालवण तहसीलदार यांच्यासह नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांची उपस्थिती.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त मालवणच्या तहसीलदार कार्यालयात शासकीय ध्वजारोहण केले.
यावेळी मालवण तहसीलदार अजय पाटणे यांच्यासह मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर उपस्थित होते.
मालवण पोलिस दलातर्फे संचलन ध्वजवंदना दिली गेली.
यावेळी मालवणचे पोलिस निरीक्षक विजय यादव यांच्यासह पोलिस दलातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शालेय मुलांनी राष्ट्रगीताचे गायन केले.
त्यानंतर आमदार वैभव नाईक आणि तहसीलदार अजय पाटणे यांनी विविध प्रशासकीय मुद्दे आणि प्रकल्पांविषयी चर्चा केली.
आमदार वैभव नाईक यांनी काही सामान्य नागरीकांशीही यावेळी संवाद साधला.
या वेळी आमदार वैभव नाईक,तहसीलदार अजय पाटणे,पोलिस निरीक्षक यादव , माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,मालवणचे माजी बांधकाम सभापती व नगरसेवक मंदार केणी,माजी नगरसेवक पंकज सादये, माजी नगरसेवक नितीन वाळके,माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे व सेजल परब, नीलम शिंदे, हरि घारे यांच्यासह महसूल अधिकारी व इतर अनेकजण उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)