देवळातील फंडपेटी फोडून रक्कम चोरल्याच्या गुन्ह्यातून आरोपी निर्दोष मुक्त ; संशयित आरोपी तर्फे ॲड.भुवनेश प्रभुखानोलकर व ॲड.कन्हैया निवतकर यांचा युक्तिवाद..
कुडाळ | प्रतिनिधी : कुडाळ तालुक्यातील नेरूर कुडगळवाडी येथील श्री देवी तुळजाभवानी मंदिर, नेरूर ठाकूरवाडी येथील श्री देव चौकुर्ण मंदिर तसेच मांडकुली येथील श्री देव लिंगेश्वर मंदिर या मंदिरातील दरवाजांचा कोयंडा व कुलूप तोडून गाभा-यातील फंड पेटीतील रक्कम अज्ञात इसमाने चोरून नेल्याची फिर्याद श्री सुभाष नाईक यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात दिली होती. याबाबत तपास सुरू असताना पोलिसांनी संशयित आरोपी सतीश मुरलीधर झाजम रा. तळेबाजार, देवगड याला अटक करून त्याचे विरुद्ध कुडाळ न्यायालयात भा. दं. वि. कलम ४५४, ४५७, ३८० या गुन्ह्याखाली दोषारोप पत्र दाखल केले होते.
या प्रकरणामध्ये सरकारी पक्षाने एकूण पाच साक्षीदार तपासले होते. मात्र साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती व संशयित आरोपीतर्फे ॲड.भुवनेश प्रभुखानोलकर यांनी केलेला युक्तिवाद विचारात घेऊन मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कुडाळ यांनी संशयित आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. संशयित आरोपीतर्फे ॲड.भुवनेश प्रभुखानोलकर तसेच ॲड.कन्हैया निवतकर यांनी काम पाहिले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)