ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मधमाश्यांच्या हल्ल्यात शाळेतील ८ विद्यार्थ्यांसह २ शिक्षक जखमी ; कळसुली येथील घटना.

मधमाश्यांच्या हल्ल्यात शाळेतील ८ विद्यार्थ्यांसह २ शिक्षक जखमी ; कळसुली येथील घटना.

प्रकाशन: 30 Apr 2022 02:54 PM
वाचन संख्या 329

कणकवली | बंटी राणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कळसुली गावडेवाडी जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वर्गात घुसून आग्या मधमाश्यांनी हल्ला केल्याची घटना ९ ;३०च्या सुमारास घडली. या हल्ल्यात 8 विद्यार्थी सह २ शिक्षक जखमी झाले आहेत.कळसुली गावडेवाडी नदीच्या दिशेने आलेल्य १०० हुन माशांनी शाळेच्या आवारात खेळत असलेल्या २ मुलांच्या मागून येत वर्गात घुसले, व वर्गात घुसून ८ विद्यार्थ्यांसहीत २ शिक्षकांवर मधमाश्यांनी हल्ला केला.

मधमाश्यांनी हल्ला केलेल्या गावडेवाडी शाळेतील विद्यार्थी जखमी अवस्थेत आहेत. यांची माहिती रुजाय फर्नांडिस यांनी डॉ. पोळ यांना मोबाईलद्वारे संपर्क करून माहिती दिली असता, कळसुली प्रा. आरोग्य केंद्रातील 102 अँबुलन्सच्या सहाय्याने कळसुली प्रा.आरोग्य केंद्रात उपचारासाठी या विद्यार्थ्यांना आणण्यात आले.

ऐकून १२पैकी ८विद्यार्थी उपस्थित होते.या ८ ही विद्यार्थ्यांसह २ शिक्षकावर हल्ला केला. या सर्व विद्यार्थ्यांनवर कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असल्याची माहिती मुख्याध्यापक सौ. तन्वी आपटे यांनी दिली.

कळसुली जि.प.शाळेतील विद्यार्थी रिद्धी सावंत, निधी सावंत, वक्रतुंड प्रभू, रोशन पाडावे,सानिका राऊत, सानिका देसाई, मयूर राणे,मानवी पाडावे,सर्व विद्यार्थ्यां ८ ते ९ वयोगटातील असून,कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत असताना असून ३ विद्यार्थ्यांना उलटी झाली असून,अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती डॉ. पोळ यांनी दिली.

यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस,सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी,माझी तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर चव्हाण, संतोष सुतार,प्रकाश दळवी,गणेश पाडावे, एकनाथ दळवी, कोमल राऊत, रेश्मा प्रभू,किशोर राऊत,राजेश्री पाडावे, प्रतिक्षा सावंत,प्रियकां देसाई,सचिन झाटे पालक व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स