ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
श्री आदिष्टी देवी विकास सेवा सोसायटी खांबाळे चेअरमनपदी प्रविण गायकवाड तर व्हाईस चेअरमनपदी जगदीश पवार  बिनविरोध.

श्री आदिष्टी देवी विकास सेवा सोसायटी खांबाळे चेअरमनपदी प्रविण गायकवाड तर व्हाईस चेअरमनपदी जगदीश पवार बिनविरोध.

प्रकाशन: 30 Apr 2022 04:01 PM
वाचन संख्या 65

वैभववाडी |नवलराज काळे : श्री आदिष्टी देवी विकास सेवा सोसायटी खांबाळेची निवडणूक ग्रामस्थांच्या एकोप्याने राजकिय विरहित आदिष्टी देवी सहकार पॅनेलच्या माध्यमातून ही बिनविरोध केली होती. या सोसायटीच्या चेअरमनपदी प्रविण गायकवाड आणि व्हाईस चेअरमनपदी जगदीश पवार यांची सर्व संचालकांच्या मधून बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालकांचे शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

यावेळी माजी चेअरमन दीपक चव्हाण, सुनिल पवार, नवनिर्वाचित चेअरमन प्रवीण गायकवाड, व्हाईस चेअरमन जगदीश पवार, उपसरपंच गणेश पवार, राजाराम वळंजू, रुपेश कांबळे, महेश चव्हाण, प्रसाद कदम, प्रकाश लांजवळ, पुजा लवू पवार, स्नेहलता प्रभाकर पवार, गंगाराम अडुळकर या सर्व संचालकांसह सोसायटी सचिव सिद्धेश रावराणे, माजी सभापती शुभांगी पवार, ग्रामपंचायत सदस्य अमोल चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य लवू पवार, जेष्ठ ग्रामस्थ सदानंद वासुदेव पवार आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन सुनिता आशिष भोगले यांनी काम पाहिले. तसेच निवडणूक अधिकारी भोगले यांनी सोसायटी बिनविरोध केल्याबद्दल खांबाळे गावातील सेवा सर्व ग्रामस्थांचे, नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स