ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आई ही खरी वैज्ञानिक : शिक्षणाधिकारी महेश धोत्रे

आई ही खरी वैज्ञानिक : शिक्षणाधिकारी महेश धोत्रे

प्रकाशन: 29 Apr 2022 11:59 AM
वाचन संख्या 205

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय ऑनलाईन उपक्रमाचे बक्षीस वितरण संपन्न.

चिंदर | विवेक परब : राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय ऑनलाईन उपक्रमाचा बक्षीस वितरण कार्यक्रम तालुका स्कूल मालवण येथे शिक्षणाधिकारी श्री. महेश धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी श्री. धोत्रे म्हणाले की आईच्या हातात रोज विज्ञान असते. घरातील प्रत्येक कामात वैज्ञानिक तत्वांचा तिला वापर करावा लागतो.
विज्ञान हे शिकण्यापेक्षा जगण्याचे साधन आहे. म्हणूनच विज्ञान शिकल्याशिवाय जीवनात यशस्वी होता येणार नाही. आजच्या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संधी उपलब्ध करून देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. विज्ञान परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासना करण्याची चांगली संधी प्राप्त झाली आहे.

राष्ट्रीय विज्ञान परिषद २०२२ च्या ऑनलाईन सादरीकरणामध्ये दोन गटात मिळून सिंधुदुर्गातील ९१ विद्यार्थी सहभागी झाले होते. यातून सात विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली. या स्पर्धेतील विजेते अनुक्रमे लहान गटातून – साक्षी जिकमडे, वैष्णवी जिकमडे, (प्रगत विद्या मंदिर रामगड), आर्यन प्रभुगांवकर (टोपीवाला हायस्कूल मालवण), दुर्वांक गावडे (कुडाळ हायस्कूल कुडाळ) आणि मोठ्या गटातून – राहुल सारंग (पंतवालावलकर जूनियर कॉलेज देवगड), प्रणव गणपत नाईक (खेमराज इंग्लिश स्कूल बांदा), पूर्वा परुळेकर, स्वरा सावंत (मदर क्विंस इंग्लिश स्कूल सावंतवाडी) यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. राज्यस्तरावर सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून कुमार राहुल प्रदीप सारंग या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्यामुळे त्याचाही विशेष सत्कार करण्यात आला.

विज्ञान परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपक्रमासाठी उपशिक्षणाधिकारी श्री. रामचंद्र आंगणे आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी श्री. मुश्ताक शेख यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांच्यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन तसेच नियोजन व्यवस्था केली. याबद्दल विज्ञान परिषदेच्या वतीने त्यांचे आभार मानले.

सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश ठाकूर होते. विस्तार अधिकारी उदय दिक्षित, देवगड कॉलेजचे प्राचार्य पारस जाधव, सहभागी शाळांचे मार्गदर्शक शिक्षक, पालक, विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.

सूत्रसंचलन श्री. गुरूनाथ ताम्हणकर यांनी केले तर आभार श्री. ह्रदयनाथ गावडे यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स