महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मालवण तालुका शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन इंदिरादेवी वर्दम हायस्कूल पोईप विरण येथे संपन्न..
मालवण तालुका अध्यक्षपदी सुयोग धामापूरकर, उपाध्यक्ष महादेव असरोंडकर यांची निवड.
मालवण | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा मालवणचे त्रैवार्षिक अधिवेशन इंदिरादेवी वर्दम हायस्कुल पोईप विरण येथे संपन्न झाले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री नितीन कदम यांच्या अध्यक्षतेखाली व उदघाटक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राजन कोरगांवकर , जेष्ठ सल्लागार भाई चव्हाण, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अधिवेशन आयोजीत केले गेले होते.
पुढील सन २०२२ ते सन २०२५ या पुढील तीन वर्षाकरिता तालुका कार्यकारिणी जाहिर करण्यात आली .
मालवण तालुका अध्यक्ष सुयोग धामापूरकर, उपाध्यक्ष महादेव असरोंडकर, सचिव जीवन हजारे, कार्याध्यक्ष रुपेश गरूड, कोषाध्यक्ष राजेंद्रप्रसाद गाड, शिक्षक नेते मंगेश कांबळी, प्रवक्ता नवनाथ भोळे अशा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रामचंद्र कुबल व समिक्षा सर्पे तर आभार नवनाथ भोळे यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)