ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चिंदर येथील आई भगवती माऊली देवी सातवा वर्धापन दिवस ६ मे रोजी….!

चिंदर येथील आई भगवती माऊली देवी सातवा वर्धापन दिवस ६ मे रोजी….!

प्रकाशन: 25 Apr 2022 10:52 AM
वाचन संख्या 409

चिंदर | विवेक परब : मालवण तालुक्यातील चिंदर गावची आई भगवती माऊली म्हणजे भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असून या भगवती माऊलीचा पुनः प्रतिष्ठापना सातवा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार ६मे रोजी बारापाच, मानकरी, भगवती सेवा समिती, श्री भगवती उत्साही मंडळ चिंदर/मुंबई व ग्रामस्थ यांच्या संयुक्त पुढाकाराने संपन्न होत आहे.

या कार्यक्रमाला सकाळी 8 ते 1 वा-श्री गणेश पूजन, भगवती माऊली चरणी अभिषेक, नवचंडिका होमहवन, महाआरती, 1ते3 महाप्रसाद, 4ते6 वा. हळदिकुंकू समारंभ, रात्री 8वाजता भगवती प्रासादिक भजन मंडळ भटवाडी यांचे सुस्वर भजन, 9वाजता हितचिंतक देणगीदार, मान्यवर यांचा सत्कार सोहळा, रात्री 10 वाजता कै. बाबी कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर कुडाळ यांचा “चोर झाला धनाचा अधिपती” हा ट्रिक सिन दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी देणगीदार हितचिंतक यांनी श्री. अरविंद महादेव घाडी 9423879390, संदिपभाई पारकर 7768886950 व सुनिल घाडी 9420308454 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन सेवा समिती व मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स