ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
पत्रकार ॠषी देसाई ठरले छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण ..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

पत्रकार ॠषी देसाई ठरले छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण ..!

प्रकाशन: 24 Apr 2022 10:12 PM
वाचन संख्या 155

कंधार येथे ना.अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार पुरस्कार प्रदान समारोह..!

मुंबई | ब्युरो न्यूज : समाजात पत्रकारांनी केलेल्या उत्तम कामाचा उचित् सन्मान झाला पाहिजे या उद्देशाने कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान व हिंदवी बाणा लाईव्हच्या वर्धापण दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय , मराठवाडा स्तरीय व नांदेड जिल्हातील 16 तालुक्यातील उत्कृष्ट पत्रकारांना पुरस्कार देवुन त्यांचा गौरव केला जातो.

Article image

हा पुरस्कार वितरण सोहळा दि 30 एप्रिल रोजी सकाळी 10-30 वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री नामदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते कंधार येथे होणार आहेत.

कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान कंधारच्या वतिने दरवर्षी उत्कृष्ट पत्रकारांना पुरस्कार देवुन त्यांचा गौरव केला जातो. पुरस्कार http://localhost/news/public/uploads/2021 चे मानकरी  छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भुषण राज्यस्तरीय पुरस्कार  लोकशाही न्यूज चे वृत्तनिवेदक ऋषी देसाई (मुंबई ) यांना तर बाळशास्त्री जांभेकर मराठवाडा भुषण पुरस्कार दैनिक पुण्यनगरीचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी कालीदास जहागीरदार (नांदेड ) आणि  दैनिक नांदेड चौफेरचे संपादक पठाण आरेफ खान यांना महात्मा फुले उत्कृष्ठ पत्रकारीता जिल्हास्तरीय पुरस्कारासह जिल्हयातील सोळा तालुक्यातील निवड झालेल्या पत्रकारांना पुरस्कार  वितरीत करण्यात येणार आहे.

ऋषी देसाई हे लोकशाही न्यूज मध्ये वृत्त निवेदक म्हणून कार्यरत असून यापूर्वी साम मराठी, झी 24 तास, टीव्ही नाईन मराठी या अग्रगण्य वृत्त वाहिन्यात त्यांनी मागील दशकभरात स्वताचा वेगळा ठसा उमटवला आहे. ‘समीक्षा’, प्राईम वॉच, डोळ्यांन पाहीन रूप तुझे, अशा कार्यक्रमाच्या माध्यमतून आपल वेगळेपण मांडताना लोकशाही न्यूजवरील ‘ऋषी देसाईचा फटका’ हा महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय व्यवस्थेवर कोरडे ओढणारा कार्यक्रम प्रेक्षकांसोबत टेलिव्हिजन रेटिंग पॉईंटवर आपली छाप उमटवत घोडदौड करतोय. मालवणी बोलीभाषेतील लेखनासह राजकीय लेखन याबद्दलही ऋषी देसाई यांची विशेष ओळख आहे.

30 एप्रिल http://localhost/news/public/uploads/2022शनिवारी सकाळी साडेदहा वाजता पुरस्कार वितरण सोहळा सोहळा मोठ्या थाटात संपन्न होणार आहे.राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री नामदार अशोकराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी लोकशाही न्यूज चे वृत्तनिवेदक ऋषी देसाई हे पत्रकारांना नव्या माध्यमातील पत्रकारिता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स