ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>जिल्ह्यात ८ मेपर्यंत मनाई आदेश केला लागू….!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>जिल्ह्यात ८ मेपर्यंत मनाई आदेश केला लागू….!</em>

प्रकाशन: 25 Apr 2022 11:25 AM
वाचन संख्या 940

कणकवली | बंटी राणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात ८ मेपर्यंत मनाई आदेश लागू केला आहे.

सद्य कालावधीत सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात विविध धार्मिक सण साजरे होत असून देशात व राज्यात विविध ठिकाणी सांप्रदायिक घटनाही घडत आहेत. त्यांचे पडसाद जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामाजिक तसेच वैयक्तिक कारणांसाठी, मागण्यांसाठी आंदोलने, निदर्शने होत असून आगामी काळात जिल्ह्यामध्ये अचानकपणे उपोषणे, मोर्चा, निदर्शने, रस्ता रोको वगैरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रम  होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे.

जिल्ह्यात मनाई आदेशाप्रमाणे,
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) व 37 (3) नुसार आजपासून 8 मे पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी लागू केला आहे. या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलम 37 (1) लागू असेल. त्या अनुषंगाने शस्त्रे, साटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या तसेच शारीरिक इजा करण्यांसाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे, सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे, जिल्ह्यात पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणूका काढणे व सभा घेणे, वरील कालावधीतील मिरवणुकांना परवानगी देण्यांचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स