ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मालवणात 'आय पि एल 2020' चा मुंबई इंडियन्स स्टार स्क्वाड मेंबर दर्शन बांदेकर देणार प्रशिक्षणाचे धडे..!

मालवणात 'आय पि एल 2020' चा मुंबई इंडियन्स स्टार स्क्वाड मेंबर दर्शन बांदेकर देणार प्रशिक्षणाचे धडे..!

प्रकाशन: 20 Apr 2022 04:41 PM
वाचन संख्या 361

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील टोपीवाला स्पोर्ट्स अकॅडेमी यांच्या वतीने येत्या 1 मे ते 31 मे http://localhost/news/public/uploads/2022 या कालावधीत 12 ते 23 वर्षे वयोगटातील मुला – मुलींसाठी उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे टोपीवाला बोर्डिंग मैदानावर आयोजन करण्यात आले आहे.

या शिबीरात दुबईतील ‘आय पि एल http://localhost/news/public/uploads/2020’ चा मुंबई इंडियन्स स्टार स्क्वाड मेंबर दर्शन बांदेकर हा स्टार खेळाडू लहान मुला मुलींना प्रशिक्षण देणार असल्याची घोषणा शिबिराच्या आयोजकांनी केली आहे .!

सकाळी 7 ते 8.30 अशी प्रशिक्षणाची रोजची वेळ असेल.
प्रत्येक खेळाडूकडे वैयक्तिक लक्ष ,फिटनेस सेशन, माईंड डेव्हलपमेंट,फिल्डिंग सेशन,ओपन नेट टर्फ विकेट प्रॅक्टिस, बॅटिंग आणि बॉलिंग स्किल डेव्हलपमेंट, निःशुल्क असे 4 सराव सामने तथा मालवण दौऱ्यावर येणाऱ्या पाहुण्या संघाविरुद्ध सराव सामने असे या प्रशिक्षण शिबिराचे स्वरुप आहे.

ज्या खेळाडूंना या प्रशिक्षण शिबिरात सहभाग घ्यायचा असेल त्यांनी प्रशिक्षण शुल्क रुपये 1500 सहित आपली नावे दिनांक 30 एप्रिल http://localhost/news/public/uploads/2022 पर्यंत गोविंद ऊर्फ बंटी केरकर यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

खेळाडूंनी आपले प्रशिक्षण शुल्क 9637232192 या क्रमांकावर गुगल पे किंवा फोन पेच्या माध्यमातून जमा करावे अशी अधिकृत माहिती शिबीर आयोजकांनी दिली आहे.

नांव नोंदणी व शिबिरातील इतर सर्व अधिकार व नियम याविषयी आयोजकांचे मत हे अखेरचे असेल.

(फोटो संग्रहीत)

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स