साहित्य प्रेरणा कट्टयाच्या अठराव्या सभेचे आयोजन..!
‘सभोवतालकार’ व प्रेरणा कट्टाचे संघटक विनय सौदागर यांनी आगामी पुस्तक दिनासाठी केले साहित्यप्रेमींना आवाहन..!
चिंदर | विवेक परब : जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्टयाची अठरावी सभा २३एप्रिल रोजी आजगांव वाचनालयात संध्याकाळी ५वाजता आयोजित केली आहे.
कोरोना काळानंतर साहित्य कट्टा परत सुरु होत आहे. सभेमध्ये ‘आवडीचे पुस्तक व पुस्तकांची आवड’ या विषयावर चर्चा होणार आहे. यात मुख्यत्वे डाॅ. सुधाकर ठाकूर, डाॅ. मधुकर घारपुरे व जेष्ठ साहित्यिक विनय सौदागर आपले विचार मांडतील. या सभेला साहित्यिक, साहित्यप्रेमी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कट्टाचे संघटक विनय सौदागर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)