ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सन्माननीय शिवसेनाप्रमुखांच्याच धड्याचा राज ठाकरे यांनी घेतलाय उजळणी वर्ग : अमित इब्रामपूरकर.

सन्माननीय शिवसेनाप्रमुखांच्याच धड्याचा राज ठाकरे यांनी घेतलाय उजळणी वर्ग : अमित इब्रामपूरकर.

प्रकाशन: 20 Apr 2022 06:02 PM
वाचन संख्या 52

मालवण | ब्युरो न्यूज : शिवसेनेचे संस्थापक, हिंदूह्रदयसम्राट आणि मराठी अस्मितेची आस्था असणार्या सन्मामाननीय कै. बाळासाहेबांनी हिंदुंच्या रक्षणासाठी,व्यापक हिंदुत्वाचा नारा देत आणि त्यावर ठाम रहात संघटनात्मक काम करुन शिवसेना पक्ष वाढवला याची आठवण खासदार विनायक राऊत यांनी ठेवावी.
मनसे प्रमुख राज ठाकरे हे महाराष्ट्रात दंगली घडवण्याची सुपारी घेत असल्याच्या खासदारांच्या टिकेला उत्तर देताना मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी हे प्रतिपादन केले.

Article image

कै.बाळासाहेबांनी मशिदींवरचे भोंगे काढलेच पाहिजेत हे भरसभेत सांगितले होते. सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणास विरोध केला व तिथे महाआरत्यांचे आयोजन केले त्यावेळी दंगल होणार नव्हती काय? राज साहेबांवर सुपारी घेऊन दंगल घडवण्याचा आरोप करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी इतिहासाची आठवण ठेवावी.सत्तेत राहून भ्रमिष्ट झालेले असाल तर त्यावेळच्या माननिय बाळासाहेबांच्या भाषणाच्या क्लिप्स आमच्याकडे आहेत.ते तुम्हाला आम्ही पाठवून देवू.

सत्तेच्या हव्यासापोटी शिवसेनेने हिंदुत्व बाजुला ठेवलं आणि राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी युती केली.हे शिवसेनेचे बेगडी हिंदुत्व आहे हे तुम्हाला मान्य करावेच लागेल असेही इब्रामपूरकर म्हणाले.

राजसाहेबांनी हिंदुत्व आणि मराठी अस्मिता यासाठी मनसे पक्षाची स्थापना केली.हे लक्षात ठेवा. सन्माननीय बाळासाहेबांकडूनच राजसाहेबांनी हिंदुरक्षणासाठी बाळकडू घेतले. हिंदुह्रयसम्राट ही बाळासाहेबांची नावासमोरची उपाधी राजसाहेबांनी स्वतः घेतली नाही. आज खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार पुढे घेउन जाण्याचा प्रयत्न राजसाहेब करत आहेत असेही मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.

कै. सन्माननीय बाळासाहेब यांनी घालून दिलेल्या धड्यांचा उजळणी वर्ग घेतला म्हणून शिवसैनिकांनी आक्षेप घेण्याचे कारण नाही असा टोलाही इब्रामपूरकर यांनी लगावला आहे.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स