केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे व मंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 'वाडीवरवडे प्रीमियर लीग' स्पर्धा संपन्न..!
श्री देवी भराडी युवक कला क्रीडा मंडळ वाडीवरवडे कुडाळ यांचा भव्य कार्यक्रम..!
चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ वाडिवरडे येथे केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे आणि श्री देवी भराडी युवक कला क्रीडा मंडळ औचित्य साधून ‘वाडीवरवडे प्रिमीअर लीग http://localhost/news/public/uploads/2022’ क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली.
या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला
श्री. रणजित देसाई, श्री. संजय वेंगुर्लेकर, श्री मंगेश (भाऊ) प्रभू, श्री. रूपेश कानडे, सौ. आरती पाटील, श्री. बाबू काका, श्री. अमेय धुरी, श्री. गुरुनाथ दामले, .श्री. सुर्यकांत गाड, श्री. गणेश गाड, श्री. रविंद्र पालव, श्री नितीन कदम, श्री. गुणाजी धुरी तसेच असंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, खेळाडू व ग्रामस्थ उपस्थित होते.
समारोप समारंभाचा कार्यक्रम श्री मंगेश (भाऊ) प्रभू,श्री. राजू राऊळ,श्री. गावडे, श्री. वालावलकर, अमेय धुरी, श्री. गुरुनाथ दामले, श्री. सुर्यकांत गाड, श्री. गणेश गाड, श्री. रविंद्र पालव, श्री रविंद्र धुरी तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, खेळाडू व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
समारंभासाठी
१) विजेता बक्षीस रोख रू. १५,०००/-
भाजप कुडाळ तालुका पुरस्कृत
२) उपविजेता बक्षीस रोख रू. १०,०००/-
भाजप कुडाळ तालुका पुरस्कृत
३) विजेता चषक रू. ७,५००/-
श्री रणजीत देसाई, जि.प.सदस्य पुरस्कृत
४) उपविजेता चषक रू. ६,०००/-
श्री उमेश धुरी, सरपंच-साळगाव व श्री. रूपेश कानडे, तालुका युवा अध्यक्ष पुरस्कृत
५) सेमी फायनल पराभूत साठी चषक प्रत्येकी रू. २,५००/- (२)
१ श्री. राजू राऊळ पुरस्कृत
२ श्री. राजन धुरी पुरस्कृत यांच्यातर्फे व अशी आर्थिक बक्षिसे पुरस्कृत केली गेली होती.
या लिगच्या माध्यमातून जमलेल्या रकमेपैकी परब रोख रु. १०,०००/- ची आर्थिक मदत परब कुटुंबियांना देण्यात आली. कुडाळ तालुका भाजप व तेंडोली मतदार संघ आणि भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व व्यावसायिक यांच्या सहकार्यामुळे आम्ही ही स्पर्धा आयोजीत करुन साध्य करु शकलो असे प्रतिपादन आयोजक मंडळातर्फे करण्यात आले आहे.
वाडीवरवडे प्रिमियर लीग २०२२ चा विजेता संघ- विठ्ठल-रखुमाई स्पोर्टस्, वाडीवरवडे
उपविजेता संघ- मोरया स्पोर्टस्, वाडीवरवडे उपांत्य फेरीत पराभूत संघ.
१. विधी फायटर
२. एम्पायर जिम
मालिकावीर – विक्रम कानडे
उत्कृष्ट फलंदाज- योगेश गवस
उत्कृष्ट गोलंदाज- अलंकार राऊळ
उत्कृष्ट यष्टीरक्षक- रूपेश निकम
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक- विशाल गावडे
उदयोन्मुख खेळाडू- योगेश धुरी यांना गौरवण्यात आले.
स्पर्धेत अनुभवी समालोचक बादल चौधरी, विकास मठकर, संतोष परब व चिन्मय हडकर यांनी समालोनाची जबाबदारी निभावली.
रुपेश निकम, सगुण केरवडेकर व बाळकृष्ण धुरी यांची पंच म्हणून वाडीवरवडे प्रिमियर लीग मध्ये कामगिरी बजावली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)