बाजारपेठ वाडितील श्री साई मंदिर वर्धापन दिनानिमित्त रक्तादान शिबिर….!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे गडगेघेरा बाजार पेठ येथील श्री साई मंदिर वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच समाजासाठी आवश्यक आरोग्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 18 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता आरोग्य विषयक अत्यावश्यक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मसुरे परिसरातील ग्रामस्थ,भाविक आणि इतरांनी जास्तीतजास्त संख्येने यात सहभाग घेऊन या सामाजिक ‘साई सेवा कार्यात’ सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)