ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरेत साई मंदिर येथे धार्मिक कार्यक्रम ;२०-२० डबलबारीसह दशावतार नाट्यप्रयोग
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरेत साई मंदिर येथे धार्मिक कार्यक्रम ;२०-२० डबलबारीसह दशावतार नाट्यप्रयोग

प्रकाशन: 17 Apr 2022 07:19 PM
वाचन संख्या 142

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे गडघेरा बाजार पेठ येथील श्री साई मंदिर वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १८ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी बारा वाजता आरती व साई भंडारा, सायंकाळी सात वाजता पालखी मिरवणूक, रात्री आठ वाजता आरती आणि प्रसाद वाटप, रात्री नऊ वाजता २०-२० डबलबारी भजन सामना होणार आहे. भजन सम्राट   विजय परब यांचे शिष्य वडची देवी प्रसादिक भजन मंडळ लिंगडाळ देवगड येथील  बुवा श्री संदीप लोके यांना पखवाज योगेश सामंत, तबला संदेश सुतार विरुद्ध   गुरुवर्य प्रदीप पांचाळ यांचे शिष्य देवी सातेरी  प्रसादिक भजन मंडळ पावशी तालुका कुडाळ येथील बुवा अरुण घाडी याना तबला गौरव पिंगुळकर आणि पखवाज विनीत  धुरी यांच्या मध्ये होणार आहे.

दिनांक १९ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता आरती व तीर्थ प्रसाद,रात्री  सात वाजता साई मंदिर सभोवती पालखी मिरवणूक, रात्री आठ वाजता आरती व तीर्थ प्रसाद, रात्री नऊ वाजता संतोष मसुरकर टोकळवाडी यांचे सुश्राव्य भजन, रात्र साडेनऊ वाजता श्री विठ्ठला देवी दशावतार नाट्य मंडळ राठीवडे यांचा  चंड मायाजाळ हा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घेण्याचे आव्हान साई भक्त मंडळ मसुरे गडघेरा बाजारपेठ यांनी केले आहे.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स