शिक्षिका अनुष्का गावडे राजमाता जिजाऊ आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान..!
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेमार्फत दिला जाणारा राजमाता जिजाऊ आदर्श शिक्षक पुरस्कार आरोस येथील विद्याविहार इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षिका सौ. अनुष्का गावडे यांना प्रदान करण्यात आला आहे .
आरवली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सौ. अनुष्का गावडे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आरवली बालदत्तनाथ महाराज संस्थानचे क्षेत्राधिकारी शिवचैतन्य आजोबा, आ. रमेश पाटील, ॲड. चेतन पाटील, पुणे जिल्हा बँक चेअरमन सौ. अर्चना घारे परब, संघटनेचे अध्यक्ष अनिल राणे, सचिव गजानन नानचे, अध्यापक संघाचे लक्ष्मण पावसकर, रेडी माजी उपसरपंच गायत्री सातोसकर, शाबी तोरसकर, विजय गवस, वैभव केंकरे आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)