मालवण शहरात 16 एप्रिलपासून पाणी कपात…!
धामापूर तलावातील घटत्या पाणी पातळीचा नळपाणी योजनेवर झाला परिणाम..!
मालवण | ब्युरो न्यूज : मालवण नगरपरिषदेच्याच शहर पाणी पुरवठा योजनेमार्फत शहरात व शहराबाहेर पाणी पुरवठा करण्याात येत आहे. सध्या धामापूर तलावक्षेत्रातील पाण्याची पातळी झपाटयाने कमी होत असल्याने आणि अनियमित विद्युत दाबाच्या पुरवठ्यामुळे नगरपरिषदेमार्फत मालवण शहरात करण्यात येणारा पाणी पुरवठा दिनांक 15/04/public/uploads/2022 पर्यंत नियमीत व रोजच्याच वेळेप्रमाणे पाणी पुरवठा होईल. दि. 16/04/public/uploads/2022 पासून पाणी पुरवठा एक दिवस आड करण्यात येईल. याची सर्व नळधारकांनी नोंद घ्यावी व नगरपरिषदेस सहकार्य करावे अशी माहिती नगरपरिषद मार्फत देण्यात आली आहे
झोन 1 दि.16/04/public/uploads/2022
आडारी रोड गणपती मंदिर पर्यत, नारायण मंदिर समोरील शांतीसागर मैदान परीसर, पेट्रोल पंप समोरील परिसर, कुडाळकर हायस्कूल जवळील परिसर, डाॅ.रेडकर हॉस्पीटलच्या आजूबाजूचा परिसर, गवंडीवाडा, दांडी मोरेश्वर मंदिर परीसर, आडवण-वायरी रोड, रामेश्वर मंदिर मागील परिसर, सातेरी मंदिर जवळील परिसर.
झोन 2 दि.17/04/public/uploads/2022
धुरीवाडा, गारुडेश्वर मंदिर पर्यत, श्रीकृष्ण मंदिर, चिवला बीच ते चौकचार रोड, कोतेवाडा, कचेरी रोड, मेढा काळबादेवी रोड, पोलिस वसाहत ते राजकोट, जयगणेश मंदिर परीसर, भुत आंबा ते रेवतळे चर्च रोड, फाटक शाळा परीसर, भरड ते बंदर जेटी पर्यत, लिमये हॉस्पिटल ते पोस्ट ऑफिस समोरील परीसर.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)