ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
'टाॅवरमे पाॅवर...!'

'टाॅवरमे पाॅवर...!'

प्रकाशन: 14 Apr 2022 05:52 PM
वाचन संख्या 451

चौके | अमोल गोसावी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या काळसे धामापूर ग्रामस्थांची बी.एस.एन.एल नेटवर्क ची प्रतिक्षा अखेर आजपासून संपली आहे. ग्राहकांची बऱ्याच दिवसांची मागणी असलेला काळसे माळकेवाडी येथे उभारण्यात आलेला बी.एस.एन.एल टॉवर आज दुपारी कार्यान्वित करण्यात आला.

सदर टॉवरचे उद्घाटन उद्या शुक्रवार दिनांक १५ एप्रिल रोजी सकाळी ११:४० वाजता खासदार विनायक राऊत यांच्या शुभहस्ते आणि आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील काही प्रमुख शिवसेना पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांनी काळसे धामापूर ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन वर्षभरात काळसे माळकेवाडी येथे टॉवर उभारून तो कार्यान्वित करून सर्वांची गैरसोय दुर केल्याबद्दल ग्रामस्थ आणि ग्राहकांनी त्यांचे आभार मानले आहेत तसेच बीएसएनएल अधिकाऱ्यांच्या तत्पर सेवेबद्दलही ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

काळसे व धामापूर वासियांची आनंदाची सद्यस्थिती व समाधान पाहून असेच दिसतेय की ‘टाॅवरमे पाॅवर आणि समाधानाच्या आनंदाचा बरसतोय शाॅवर..!’

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स