ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
<em>तारकर्ली क्रिकेट क्लब तर्फे १६ वर्षांखालील लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धा..!</em>

<em>तारकर्ली क्रिकेट क्लब तर्फे १६ वर्षांखालील लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धा..!</em>

प्रकाशन: 13 Apr 2022 10:12 PM
वाचन संख्या 156

‘इनसाईड क्रिकेट वाॅटस् अप गृप’ ठरला लेदरबाॅल क्रिकेटसाठी पहिला प्रमुख पुरस्कर्ता..!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड मैदानावर १६ वर्षांखालील तिरंगी लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
तारकर्ली क्रिकेट क्लबचे आयोजन असणारी ही स्पर्धा १६ एप्रिल व १७ एप्रिल अशी दोन दिवस खेळवली जाईल.

या लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धेला प्रमुख पुरस्कर्ता म्हणून ‘इनसाईड क्रिकेट गृप’ या वाॅटस् अप समूहाचे सहकार्य लाभले आहे.
एखादा व्हाॅटस् अप समूह निव्वळ लेदरबाॅल क्रिकेटचे प्रमुख पुरस्कर्ता असल्याची ही पहिलीच वेळ आहे.

ग्रामीण व छोटे शहरी भाग अशा दोन्ही क्षेत्रातील लेदरबाॅल क्रिकेटला मैदान देण्यासाठी तारकर्ली क्रिकेट क्लबच्या उपक्रमांपैकी हा एक उपक्रम असल्याचे तारकर्ली क्रिकेट क्लबने स्पष्ट केले आहे.

या स्पर्धेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शालेय स्तरावरील लेदरबाॅल क्रिकेटलाही चालना मिळेल असे मत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व मुंबईतील अनेक आजी माजी खेळाडुंनी व्यक्त केले आहे.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स