ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
नांदगाव विकास सोसायटीवर एकतर्फी नांदणार शिवसेना प्रणित पॅनल..!

नांदगाव विकास सोसायटीवर एकतर्फी नांदणार शिवसेना प्रणित पॅनल..!

प्रकाशन: 13 Apr 2022 10:22 PM
वाचन संख्या 73

भाजप प्रणित पॅनेलचा 13 पैकी 13 जागा गमवून सपशेल पराभव..!

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील बहुचर्चित सोसायटी निवडणुकीत भाजप व शिवसेनेने प्रतिष्ठेची केल्यानतंर येथे झालेल्या चुरशीच्या मतदानानंतर लागलेल्या निकालात नांदगाव विविध विकास सहकारी सोसायटीत शिवसेना प्रणित बळीराजा पॅनलने १३ पैकी १३ जागांवर विजय मिळवत भाजप प्रणित सिध्दविनायक पॅनलचा धुव्वा उडवित सर्व जागांवर विजय संपादन केला. यावेळी विजयानंतर नांदगाव सोसायटी कार्यालय व नांदगाव तिठ्ठा येथे एकच जल्लोष केला.

निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये कर्जदार गटातून श्री.विजय कदम 245,दिपक कांडर 242,आब्बास बटवाले 244,विठोबा महाडेश्वर 248 ,गौरीशंकर खोत 250,अतुल सदडेकर 238,अनिल चव्हाण 229,प्रकाश सातोसे 246,महिला प्रतिनिधी मधून हसीना बटवाले 280,प्रभावती माळकर 256, तर इतर मागस प्रवर्ग गटातून शामसूंदर मोरये 284,भटका विमुक्त जाती मधून तात्या निकम 284, अनुसूचित जाती जमाती मधून धर्माजी तांबे 280 यानी घवघवीत यश संपादन केले. विजयानंतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होत विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले. यावेळी संपूर्ण निवडूकीचे किंगमेकर गौरीशंकर खोत,माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा बँक संचालक तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले,कैन्हया पारकर, सचिन सावंत, रिमेश पावसकर, नांदगाव शाखाप्रमुख राजा म्हसकर,माजी चेअरमन रविंद्र तेली,अरूण बापार्डेकर यानी विजयी उमेदवारांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. तब्बल 78 वर्षाच्या कालावधीत एकदाच या सोसायटीची एका जागेसाठी निवडणूक झाली होती. यानतंर यावर्षी निवडणूक झाली यात शिवसेनेने बाजी मारली.यावेळी गौरीशंकर खोत यानी हा विजय वैचारीक असून नांदगाव सोसायटीतील सहा गावातील शिवसेना पदाधिकारी, मतदार,ग्रामस्थ यानी सांघिक काम केल्यामुळेच हा विजय असल्याचे सांगितले. तर सतीश सावंत यानी गौरीशंकर याची चाणक्यनितीमुळे हा विजय असून सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत मतदारांचे आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स