ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
*आचऱ्यातील रामनवमी उत्सवाच्या समारोपालापंचमुखी महादेवांच्या  पालखीस हजारो भाविकांची उपस्थिती..!

*आचऱ्यातील रामनवमी उत्सवाच्या समारोपालापंचमुखी महादेवांच्या  पालखीस हजारो भाविकांची उपस्थिती..!

प्रकाशन: 13 Apr 2022 08:20 PM
वाचन संख्या 81

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवाची सांगता बुधवारी पहाटे लळीताने झाली. यावेळी पंचमुखी महादेवाची मूर्ती पालखीत बसवून मंदिराभोवती हर हर महादेवच्या जयघोषात सोमसूत्री प्रदक्षिणा करण्यात आली. आतषबाजी व लोफेच्या सलामीने सुरू झालेल्या पालखीला हजारो भाविक उपस्थित होते.

उत्सवाच्या लळिताला वर्षातून एकदाच पंचमुखी महादेवाची मूर्ती पालखीत विराजमान करून रामेश्वर मंदिरास सोमसूत्री प्रदक्षिणा घालण्यात येते. या पालखी सोहळ्यास हजारो भाविक उपस्थित होते. बाल कलाकारांसह तरुण, ज्येष्ठांनीही तलवारबाजी, लाठीकाठी प्रात्यक्षिके सादर करीत रंगत आणली. पालखी नंतर उत्सवाच्या सांगतेचे कीर्तन रंगले. पहाटे कीर्तन आटोपल्यानंतर श्रींच्या पंचारतीबरोबर रघुपतीच्या दहा आरत्या एकाचवेळी बाहेर पडत श्री देव रामेश्वरच्या मंदिरास प्रदक्षिणा घालण्यात आल्या. कीर्तनाची सांगता झाल्यावर सर्व उपस्थित भक्तगणांना वहिवाटदार मिराशी यांच्या हस्ते श्रींचा प्रसाद म्हणून श्रीफळ वाटण्यात आले.
या सोहळ्यात देवस्थानच्या रामनवमी उत्सव सांगता सोहळ्यात शाही थाटातील पंचमुखी महादेवाची पालखी मिरवणूक विशेष आस्थेचे आकर्षण ठरली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 11
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 317

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स