मनोरमा चौधरी ट्रस्ट कडून रक्तमित्र श्री बाबली गवंडे यांचा सत्कार....!
बांदा | राकेश परब : कुडाळ वालावल येथील मनोरमा चौधरी ट्रस्ट आयोजित कार्यक्रमात वालावलच्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरात रामनवमी उत्सवाचं औचित्य साधून जिल्ह्यातील काही नामवंतांचा सत्कार झाला.
यामध्ये सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी तालुका सचिव श्री बाबली गवंडे यांना आतापर्यंत रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या कार्याची दखल घेऊन श्रीमती मनोरमा चौधरी ट्रस्टचा विशेष सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
श्री बाबली गवंडे यांनी कोरोना काळात केलेल्या आणि रक्तदान क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार बहाल केला. बाबली गवंडे यांच्यावर वर्षभरात अनेक गंभीर संकटे कोसळली तरी सुद्धा या दुःखांनी जराही विचलित न होता,रुग्णसेवेचा रक्तदानाचा अंगीकारलेला वसा बाबली गवंडे यांनीन क्षणभरही बाजूला सारला नाही, त्या सर्व परिस्थितीतही बाबली दुःख पेलत आपल्या रक्तदानाच्या कर्तव्यात निरंतर कार्यरत राहिले. रक्ताविषयक मागणीच्या सर्व पोस्ट दखल घेऊन पूर्ण केल्या.
यावेळी श्री रणजित देसाई ,मनोरमा चौधरी ट्रस्टचे अध्यक्ष श्री.दयानंद चौधरी, सुप्रसिद्ध मालवणी क्रिकेट समालोचक तथा तब्बल तेवीस वेळा रक्तदान केलेले सिंधु रक्तदाते सदस्य श्री. बादल चौधरी, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश तेंडोलकर, उपाध्यक्ष श्री महेश राऊळ, जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर, यशवंत गावडे, एकनाथ चव्हाण, दीपक तारी, अँड. संदीप चांदेकर सिद्धार्थ पराडकर आदी उपस्थित होते. यावेळी संस्था जिल्हाध्यक्षांनी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या कार्याची माहीती दिली आणि मनोरमा चौधरी चॅरीटेबल ट्रस्टचे आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)