वायरीत 0 ते 5 वर्षांच्या मुलांची नवीन आधारकार्ड बनवून मिळणार मोफत..!
मालवण | प्रतिनिधी : उद्या दिनांक 13 एप्रीलला मालवणच्या महापुरुष मंदिर वायरी येथे 0 ते 5 वर्षांच्या मुलांचे नविन आधारकार्ड बनवून मिळण्याचा उपक्रम सकाळी 11 वाजल्यापासून सुरु होणार आहे.
इच्छुक पालकांनी त्यासाठी खालील कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
- बालकाचा जन्मदाखला व बालक हजर असणे आवश्यक
- पालकांपैकी एकाचे आधार कार्ड व ज्याचे आधारकार्ड आहे तो पालक हजर असणे आवश्यक
(पालकाच्या आधार कार्ड वरचाच पत्ता बालकाच्या आधारकार्ड वर येईल व त्या पत्यावर पोस्टाने आधार कार्ड घरपोच मिळेल) - मोबाईल सोबत आणणे
अधिक माहितीसाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी श्री तपस्वी मयेकर (9404598281)आणि विजय तारी *9860837979) यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)