मार्गेश्वर हडी संघ ठरला एस.पि.एल. मुंबई 2022 चा विजेता..!
कोकण बाॅईज मालवणकडे उपविजेतेपद..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग फ्रेंड्स सर्कल गृप मुंबई आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग SPL मुंबई http://localhost/news/public/uploads/2022 क्रिकेट स्पर्धेत मार्गेश्वर हडी संघाने कोकण बॉईज मालवण संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. सिंधुदुर्ग टायटन, मसुरे पॅकर्स संघाने तृतिय क्रमांक पटकावला. यात 32 संघांनी सहभाग घेतला होता. मार्गेश्वर हडी मालवण यांना SPL आयोजन कमिटी तर्फे आकर्षक चषक व आमदार नितेशजी राणे पुरस्कृत 22,222 रुपये रोख रक्कम देण्यात आली. तसेच द्वितीय क्रमांकाचे मानकरी कोकण बॉईज मालवण यांना SPL आयोजन कमिटी तर्फे आकर्षक चषक व आमदार नितेश राणे पुरस्कृत 11,111 रुपये रोख रक्कम देण्यात आली तसेच तृतीय क्रमांक सिंधुदुर्ग टायटन आणि मसुरे पॅकर्स ( मसुरे) या संघाला डॉ अमित दुखंडे यांचा तर्फे दोन्ही टीमला आकर्षक चषक आणि श्री विकास पालव यांचा तर्फे रोख रक्कम 1111 रुपये देण्यात आले. तसेच फायनलला पोहोचलेल्या दोन्ही संघाना सौ. अश्विनी परब ( परबीन) यांच्या तर्फे सर्व खेळाडूंना मेडल देऊन सन्मानित केले तसेच या स्पर्धेचे आयोजक चेतन रासम, वसंत परब, अनिल मातेफोड, दीपक रासम, स्वप्नील तेली, महेश चव्हाण, अमित धुरी या मुंबईकर फ्रेंड्स सर्कलने केले होते .या गृप ला श्री विनायक अपराज, श्री प्रताप रासम, श्री तुकाराम रासम, श्री अभिजित रासम, श्री दीपक येसादे, डॉ श्री अमित दुखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.स्पर्धेचे समालोचन समीर पांढरे, वैभव गावडे , सिद्धेश ( युवा ) यांची साथ लाभली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
रेकोबा विद्यालयाच्या गौरांग मालंडकरची महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट संघात निवड.
एम क्रिकेट अकॅडमी सावंतवाडीच्या गुणवंत खेळाडूंचा वार्षिक सत्कार सोहळा संपन्न.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार.