'अजिंक्य' ठरली मालवण पंचायत समिती..!
आता देशपातळीवर झेंडा रोवण्याची मजबूत व आश्वासक पार्श्वभूमी झाली तयार..!
चिंदर | विवेक परब : विविध नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच जनतेच्या हिताचे कामकाज यामुळे नावाजलेली मालवण पंचायत समितीने देशपातळीवर आपला झेंडा फडकवला आहे.
देश पातळीवरील सन्मान मिळवणारी जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती ठरली आहे.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल मालवण पंचायत समितीला 25 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.
राणे साहेबांच्या भक्कम पाठिंब्यामुळे तसेच माजी खासदार निलेशजी राणे यांनी वेळोवेळी केलेल्या सूचना तसेच केलेली सर्वतोपरी मदत यामुळेच हे शक्य झाल्याचे सभापती अजिंक्य पाताडे आणि उपसभापती सतिश परुळेकर यांनी सांगितले.
तसेच याबाबत बोलताना पंचायत समितीचे मा. सभापती,उपसभापती यांनी हे श्रेय तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, जनता ,पदाधिकारी, कर्मचारी, तसेच सहकारी गटनेते सुनील घाडीगावंकर, सर्व सदस्य तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र पराडकर यांचेही असल्याचे नमूद केले.
आता देशपातळीवर अव्वल क्रमांक पटकविण्यासाठी पंचायत समितीने कंबर कसली आहे आणि सध्या प्रशासक असले तरी आपला तालुका म्हणून आम्ही सर्व माजी पदाधिकारी लक्ष देणार असल्याचे माजी सभापती अजिंक्य पाताडे यांनी नमूद केले
एकंदरीत सर्वच स्थरातून पंचायत समितीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)